Thursday 29 December 2011

व्यायाम

http://www.arogyavidya.net/arogyavi/index.php?option=com_content&view=category&id=199&layout=blog&Itemid=215 

व्यायाम म्हणजे आपल्या डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहितच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारताताल्या जातिव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी तर खाणा-यांना श्रमच नाही अशी परिस्थिती आहे. धट्टीकट्टी गरिबी म्हणण्याची आपल्यावर पाळी आहे. म्हणूनच व्यायामाचे महत्त्व आहे. व्यायाम केला नाही तर खालील दुष्परिणाम होतात.
- एकूण शारीरिक क्षमता, सहनशक्ती कमी होते. अपेक्षित आयुष्य कमी राहते.
- हृदय लवकर जीर्ण, दुबळे होणे.
- सांधे आखडणे आणि स्नायू दुबळे होणे. या आरोग्य समस्या लवकर उत्पन्न होणे.
- रक्तातली साखर वाढून मधुमेह होणे.
- शरीरात चरबी साठणे, पोट सुटणे, शुध्द रक्तवाहिन्यांत चरबीचे थर साठणे, त्यामुळे रक्तवाहिन्यांत अडथळे होणे.
- भूक व पचनशक्ती मंद होणे.
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील . या सर्व हळूहळू वाढणा-या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते. व्यायाम न करणेही अंगवळणी पडते. अनेकजण या आळसाचे समर्थन करतात. व्यायामाची आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही व्यायाम आयुष्यभर नियमित करायला पाहिजे.
व्यायाम म्हणजे नेमके काय हेही समजायला पाहिजे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेकजण व्यायाम समजतात. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवश्यक आहे. व्यायामाचे शास्त्र नीट समजावून घेण्यासाठी हे प्रकरण उपयोगी पडेल.

No comments:

Post a Comment